Psalms 142

1मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारतो;
मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो.
2मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो;
त्याला मी आपल्या समस्या सांगतो.

3जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला,

तेव्हा तू माझा मार्ग जाणला.
ज्या मार्गात मी चाललो
त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे.
4माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा,
कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही.
मला कशाचाही आश्रय नाही;
माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही.
5हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो;
मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस,
जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस.

6माझ्या आरोळीकडे लक्ष दे,

कारण माझी फार दुर्दशा झाली आहे;
माझा छळ करणाऱ्यापासून मला सोडीव,
कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत.
मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी
म्हणून माझा जीव बंदीतून काढ.
नितीमान माझ्याभोवती जमतील
कारण तू माझ्याशी चांगला आहेस.
7

Copyright information for MarULB